सुहास हे मुळात मुलाचे नाव. कधीकधी ते जेव्हा मुलींना दिले जाते, तेव्हा ते 'सुहासिनी'चे लघुरूप म्हणून असावे. म्हणजे 'मृणालिनी'चे 'मृणाल', तसे 'सुहासिनी'चे 'सुहास'.
'शीतल' हे विशेषण असल्यामुळे लिंगनिरपेक्ष असावे. अर्थात संस्कृतात नामाच्या लिंगानुसार त्याचीही भिन्न रूपे व्हावीत, आणि त्या न्यायाने मुलीचे नाव खरे तर 'शीतला' व्हावे. पण बोलताना, हाक मारताना 'कमला'चे (लघुरूप होऊन) 'कमल' होते, 'विमला'चे 'विमल' होते, तद्वत 'शीतला'चे 'शीतल' होत असावे.