तुमचा हा उपक्रम आवडला. मात्र एक विनंती करावीशी वाटते.
"मला ही कविता का आवडली ?" या धर्तीचे काहीतरी लिहायला हवे. किंवा का आवडली नाही याबद्दल...
उदाहरणार्थ, मला काही ही कविता फार नाही विशेष वाटली. तुम्ही एकूण आधुनिक कवितेचा विचार केला तर अशा धर्तीच्या कविता पन्नासपूर्व दशकात लिहील्या जायच्या. वर्ण्यविषय, तो मांडण्याची शैली , शब्दांची निवड , काव्य म्हणवून घेण्याकरता लागणारे नेमकेपण, ग्रेस , नवेपण , या सगळ्याचा मोठा अभाव जाणवला. गेल्या पन्नास वर्षात फार वेगवेगळ्या तऱ्हेची, शक्तिशाली, युगप्रवर्तक, पृथगात्म कविता लिहीली गेली त्या परंपरांचा मागमूसही या कवितेत मला दिसत नाही..
तुमच्या उपक्रमाचा हेतू खरोखर चांगला असेल ; तो पूर्ततेस नेण्याकरता अशा , प्रसंगी कठोर वाटेल अशा परीक्षणाला सुद्धा वाव हवा असे मला वाटते.