कस ओळखाव मी तुझ्या मनात आहे
कस कळेल  मी फक्त तुझ्या डोळ्यात आहे.

जरा मिळवण्या आधीच नजर चुकवतोस तु
कसे ओळखावे कोणते शब्द बंद तुझ्या ओठात आहे.

 शोधते जागा माझी सदा तुझ्या भोवताली
पण हे मात्र खर की तु माझ्या काळजात आहे.

सा-या बंद वाटा माझ्या मुक्या शब्दांच्या
तरी तु समजुन घे आयुष्य माझ तुझ्यात आहे.

मला फ़क्‍त तु हवा आहेस आणी तुझा श्वास
श्वासाबिना जगणाला काय अर्थ आहे.

कधी तरी सागं माझ्या भावना पोहचल्या मनापर्यंत
कळालच नाही तर काय अर्थ या काव्यात आहे.