कुणालाही वाटेल की हा माणुस काय थापा मारतोय! पण कुणाची शपथ घेउन सांगु? ही गंमत आहेच तशी...

आमच्या ऑफिस मध्ये एकदा मीटिंग होती, मीटिंग थोडी (जास्तच) लांबली आणि एक जण त्याची आठवड्याची सुट्टी असुनही आला होता तो जरा वैतागला. त्याला सिनेमा पाहता आला नाहे याचे दुःख होते. त्यावर मी फुंकर घालायला म्हटले, शर्माजी, आप को मिठा पसंद है ना, आप मेरे साथ पार्ला चलो, मै आपको अच्छा फलूदा, स्ट्रॉबेरी स्पेशल वगैरह कुछ खिलाता हू. पण तो यायला तयार होइना. म्हणे मला आता माज्या मित्राकडे भिवंडीला तरी जाउदे! त्यावर मी त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केला की आता संध्याकाळी उशीरा कुठे भिवंडीला जातोस... पण नाही.. त्याचा हट्ट चालुच. मग त्याने दोघा तिघाना भिवंडीला जायचे कसे ते विचारून घेतले आणि अंधेरिवरून निघाला..

दुसर्या दिवशी येउन मला म्हणाला, मी कपाळकरंटा आहे, मुर्ख आहे, तुमचे ऐकायला हवे होते... मग मी जरा त्याची समजुत काढल्यावर सांगू लागला...

तो कुणी सांगितल्याप्रमाणे अंधेरी वरून बसने मुलुंडला, तिथून धडपडत दोन रिक्शा बदलून ठाण्याला, तिथून एस्टी बसने भिवंडी असा पोचला. अमुक रस्ता, तमुक नगर असे काही बाही विचारत तासभर फिर फिर फिरला. बरे, मित्राच्या घरी गेल्यावर जेवायला लागेल म्हणून काही खाल्ले वगैरेही नाही! पण वेड्या सारखा फिरून दमून एका ठिकाणी लस्सी प्यायला गेला आणि त्या गल्ल्यावर बसलेल्या माणसाला परत पत्ता विचारला. त्याचा डोक्यात काही उजेड पडेना.. मग या पठ्ठ्याने खिशातून पत्ता लिहिलेला कागत त्याच्या हातात दिला.....

त्यावर त्या माणसाने याला विचारले, अरे भाइ, गोवंडी का पता हिवंडी मे कितना भी ढुंडो, कैसे मिलेगा? पहली बार बंबई आये हो क्या?.

या गाढ्वाला भोवळच यायची शिल्लक राहिली! कारण हा बाजिराव तब्बल वीस वर्ष मुंबईत राहतोय आणि त्याने केवळ मित्राने पत्ता दिला तेव्हा नीट वाचला नव्हता आणि कसे कुणास ठावुक, त्याच्या डोक्यात गोवंडी ऐवजी भिवंडी नोंदले गेले..