पुनःप्रत्ययाचा आनंद देणारा लेख.

ही मेड ऑफ मिस्ट होती तरिही बहुदा तंत्रज्ञांना हा धबधबा लांबच वाटत असावा. त्यामुळे 'केव्ह ऑफ विंड' नावाची अनोखी कल्पना प्रत्यक्षात आली. हि कल्पना ज्या कोणाला सुचली त्याला आमचा शि‌.सा.न. आणि दंडवतही!! धबधबा जवळून बघणे आणि त्यात भिजायची संधी मिळणे यात फरक आहे. आणि ही वातगुंफा तुमची नायगरामध्ये भिजण्याची हौसही भागवते. नायगराचा जो सगळ्यात छोटा धबधबा आहे त्याच्या पायथ्याशी जाता येतं. त्या नायगराच्या पायथ्याशी उभा राहिलो आणि त्या प्रपाताकडे पाहिलं.. मला विश्वरुप दर्शन झाल्यासारखं वाटलं.

१००% सहमत.

तिथल्याच एका पत्रकावर लिहिलं होतं की 'हा' पाहून तुम्ही निःशब्द व्हाल, आणि समजा नाही झालात तरी तुमचे शब्द 'ह्याच्या' आवाजात कुणालाच  ऐकू जाणार नाहीत! 
(मूळ सुंदर लिखाणाचे हे जरासे बटबटीत भाषांतर आहे याची जाणीव आहे पण तरी काय म्हणायचे आहे ते कळावे.)
----------
आम्ही नायगारा बघायला गेलो तेव्हा तिथे इतके भारतीय होते की भारतातीलच एखाद्या पर्यटनस्थळी आलो आहोत आणि तिथे तुरळक 'फॉरेनर्स' म्हणजे गोरी मंडळी आली आहेत असे वाटत होते.