मीरामधुराताई,

तुमचा लेख काही ठिकाणी तर अतिशय विनोदी झाला आहे.

त्या शिवाय पी. एन. ओक ह्यांचे हिंदुत्व-इस्लाम ह्या विषयांवरचे संशोधनात्मक लेख,

माझ्या मते पु. ना. ओक हे संशोधक आहेत, असे म्हणणे फार मोठा विनोद आहे.  इतर संशोधक इतकी वर्षे झकच मारत होते असे ओक साहेबांचे लेखन वाचून वाटते.

......नरेंद्र मोदी ......त्यांचा वीरव्रुत्तीचा बाणा,
पुन्हापुन्हा वाचतो आहे. मनोरंजन होते आहे.

 शिवाय मोदींना असलेला मोठ्या मोठ्या लोकांचा ( अंबानी, टाटा, सिद्धू, इ. ) पाठिंबा ह्या मुळे हिंदुत्ववादी पक्षांचीच बाजू बरोबर आहे का असा विचार आल्याशिवाय राहत नाही.
अतिशय विनोदी. :):)

'तेहेलका' पाहून झालेला मानसिक त्रास..
गर्भार बाईचे पोट फाडण्याचा पराक्रम बजरंगी साहेबांनी गाजवला आणि खुल्लमखुल्ला जगाला सांगितला. ह्या गोष्टीचा कसला मानसिक त्रास. हा तर वीरवृत्तीचा बाणा !

असेच लिहीत रहा. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.