तुमचे प्रवासवर्णन वाचतो आहे ; (अजून मागचे बरेच भाग वाचायचे आहेत ! ) आणि त्याचा पुरेपूर आनंद घेतो आहे. "जे जे उन्नत उदात्त उत्तम महन्मधुर ते ते " इतरांपर्यंत पोचवण्याची तुमची वृती विरळा आहे असे मला वाटते. जे पाहिले, जे अनुभवले तसे लिहिले ; म्हणून त्यामध्ये एक टवटवीतपणा आहे. आणि जे पाहिले ते पुरेपूर अनुभवले त्यामुळे छोटेछोटे डिटेल्स नोंदले गेले आहेत. अशा व्यक्तिगत स्पर्शाखेरीज सगळे वर्णन कोरडे ठरते. एका नवीन उमेदीच्या, तरुण माणसाने केलेली ही मुशाफिरी. कोऱ्याकरकरीत पाटीवर उमटलेल्या पहिल्या अक्षरांसारखे हे काहीतरी आहे.
तुमचे अभिनंदन आणि पुढील प्रवासाबद्दल (आणि लेखनाबद्दलही !) शुभेच्छा.