त्यात इतकी भयानक आणि कीळसवाणी द्रुश्ये दाखवली होती

परंतु प्रसार माध्यमांचा खोटेपणा मात्र नजरेसमोर आलेला आहे.

घडलेली दृष्ये आणि ज्यांनी ते केले त्यांच्याच तोंडून समर्थन असताना यात प्रसार माध्यमांचा खोटेपणा कुठे आला?

त्यावेळेस 'हम आपके हैं कौन!' हा चित्रपट एवढा गाजला होता परंतु 'टाईम्स' ने त्या चित्रपटाला मागे सारून 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' ह्याच चित्रपटाला इतकी प्रसिद्धी दिली की काही विचरू नका.

तसेच अल्पसंख्याकांना उचलून धरण्याची त्यांची व्रुत्ती आहे असे ठामपणे वाटायला लागले.

हम आपके... मध्ये सलमान खान होता हे विसरलात वाटते?

तेव्हा काही दिवसातच 'गीतरामायण' नावाच्या १० कॅसेटसचा आमच्या घरात शोध लागला

तुमचे घर केवढे मोठे आहे याची कल्पना नाही. पण १० कॅसेटचा संच घरातच असताना त्याचा "शोध" लागला, हे थोडे विचित्र वाटते.

'गदिमा नावाचे मोठे कवी होऊन गेले, त्यांनी लिहिलेली ही गाणी'

माझी प्रतिक्रिया "हरणटोळ" यांच्या प्रमाणेच!

पण एक नक्की वाटते की प्रसार माध्यमांना अशी बीभत्स दृश्ये दाखविण्याचा काही अधिकार नाही

आणि ज्यांनी ती केली त्यांना ती करण्याचा आणि वर ती दडवून ठेवण्याचा अधिकार आहे?

(लेख वाचून अचंबित) सुनील