तुमचे मत मांडल्याबद्दल धन्यवाद... प्रसारमाध्यमांचा खोटेपणा ह्याबद्दल इथे आणि इतर ठिकाणी बरीच चर्चा झाली आहे/चालू असते, त्यामुळे जास्त काही नाही लिहित.
राजकारणाबद्दल काही लिहिणे सध्या सुचत नाही.

पण काही विसंगती वाटल्या त्या लिहितो... मुख्यत्वे सिनेमा बद्दल...

हम आपके है कौन!  हा  चित्रपट १९९४ मध्ये आला होता. दिलवाले दुल्हनिया.. १९९५ मध्ये. दोन चित्रपटांमध्ये जवळपास एक ते सव्वा वर्षाचा कालावधी लोटला होता. त्यामूळे "हम आपके.. चित्रपटाला मागे सारून 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' ह्याच चित्रपटाला इतकी प्रसिद्धी दिली की काही विचरू नका. " हे पटत नाही

कुछ कुछ होता है किंवा इतर चित्रपटाच्या प्रशंसेबद्दल म्हणाल तर त्या रिव्ह्यू मध्ये एका माणसाचे मत असते. त्याला तो चित्रपट कसा वाटला त्यावर त्याचे लिखाण असते. मी तर त्यांनी लिहिल्याप्रमाणे चित्रपटाबद्दलचे मत मानत नाही. माझे मत काय असेल ते मी चित्रपट पाहून ठरवतो. आता त्या एका मतावरून तुम्ही चित्रपट पहायला गेला असाल तर मग तुम्ही घाई केलीत. (तुम्हाला चित्रपट आवडला ही गोष्ट वेगळी  )  आणि त्या काळी एवढ्ढ्ढा(आजप्रमाणे) प्रचार होत नव्हता असे मला आठवते‌.

हा कांगावा तुम्ही फक्त भारतीय प्रसार माध्यमांचा म्हणताय की इतर ही? टायटानिक चित्रपट यायच्या आधी डिस्कव्हरी वाहिनीवर टायटॅनिक जहाजाबद्दल माहिती देण्यास सुरूवात केली होती. त्या आधी ज्यूरासिक पार्क चे ही तेच. हा चित्रपटाच्या प्रचाराचा एक भाग होता असे मला वाटते.

बाकी गीत रामायण व इतर गोष्टींवर कितपत आदर/प्रेम निर्माण होईल ते आपल्याला मिळालेल्या आतापर्यंतच्या मतांवर/बिंबविलेल्या माहितीवरही आणि ते सागण्याच्या पद्धतीवरही अवलंबून असते असे मला वाटते.

प्रसार माध्यमांचा कांगावा वि. हिंदुत्वाचे राजकारण हे काय ते कळले नाही