सगळ्यांचे प्रतिसादांबद्दल अनेक धन्यवाद.
मीराताई,
आम्ही नायगारा बघायला गेलो तेव्हा तिथे इतके भारतीय होते की भारतातीलच एखाद्या पर्यटनस्थळी आलो आहोत आणि तिथे तुरळक 'फॉरेनर्स' म्हणजे गोरी मंडळी आली आहेत असे वाटत होते.
१००% पटलं.. आमच्या बसमध्येही हे 'फॉरेनर्स' तोंडी लावण्यापुरतेच होते. (हा वाक्प्रचार आहे याचा श्ब्दशः अर्थ घेऊ नये )
प्रियालीताई,
मी देशीच आहे तेव्हा "नायगरा" न लिहिणं चुकच . (ह घ्या)
टग्या,
'तसा प्रयत्न केल्यास कॅमेऱ्याची अथवा कॅमकॉर्डरची वाट लागते' ही ऍडिशन आवडली. . बाकी कॅनेडियन बाजूबद्दल बोलाल तर नाही हो.. अजून तेथिल 'सौदर्य' बघायचा योग नाही.. पण फोटो बरेच पाहिले आहेत.. डोळ्यांच्या थंडाव्यासाठी तिथे कधी जाणे होते याची वाट पाहतोय.
हॅम्लेटराव,
कनेडियन बाजूने अमेरिकन बाजूपेक्षा अधिक चांगला व्ह्यू मिळतो. हे कळल्यावर तेथील बऱ्याच गोष्टींच्या 'व्ह्यू'साठी उत्सुक आहेच.. बघू ! तोपर्यंत अमेरिकन व्ह्युवर समाधान मानावं लागेल
महेश,
वात मलाही खटकला होता पण त्यावेळी पवन इतका साधा शब्द डोक्यातच आला नाही. धन्यवाद!
बाकी सगळ्यांचे प्रोत्साहनाबद्दल आभार!!!!!
-ऋषिकेश