सर्व मनोगती मित्रांना,

ह्या लेखामुळे बर्याच लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत असे दिसते. त्याबद्दल प्रथम क्षमा मागते.

लेखनाचा मूळ मुद्दा जो मांडायचा होता तो असा - की श्रीरामाचे नाव अमानुष हत्याकांडाशी जोडले जात आहे ह्याचे फार वाईट वाटते. ( माझा हा पहिलाच लेख असल्याने मला कदाचित मुद्दा नीट मांडता आला नसेल )

हत्यार्याना शिक्षा व्हायला पाहिजेत ह्याबद्दल कोणत्याही मनुष्याचे दुमत असण्याची शक्यता नाही.

पण मग त्यानंतर प्रसार माध्यमा वर पण थोडे बंधन आलेच पाहिजे.

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हत्यारे, हत्यारे असतात, गुन्हेगारी ही व्रुत्ती आहे, त्याचा रामाच्या नामाशी काही संबंध नाही. हे जनसामान्यांपर्यंत पोचावे अशी इच्छा आहे. किंबहुना रामाचे नाव मनापासून भक्तीपूर्वक घेतले तर मनुष्याची पशूव्रुत्ती कमी कमी होत जाते ह्यावर माझा ठाम विश्वास आहे.

हत्यांकाडाचे मूळ कारण जे एकमेकांच्याबद्दल वाटणारी द्वेषभावना आणि ही द्वेषभावना घालविणे हेच 'जय श्रीराम' ह्या जयघोषाचे मूळ साध्य आहे. सर्व संतांनी हेच सांगितले आहे.

आपली मते याहून वेगळी असतील तर आदरच आहे.

आपली,

मीरामधुरा.