पारणे या शब्दाचे चित्तने दिलेले अर्थ बरोबर आहेत. मात्र "पारणे फेडणे / फिटणे" या वाक्प्रचाराचा अर्थ मोल्स्वर्थ शब्दकोशानुसार थोडा संकुचित आहे : "टू ग्रॅटिफाय (ऑर बी ग्रॅटिफाइड) सम लाँगिंग ऑर आर्डंट डिझायर" ( रोमन लिपीवरील मर्यादेमुळे देवनागरीत इंग्रजी लिहिले आहे. क्षमस्व.). तेव्हा मनोकामनापूर्ती / तृप्त होणे असा काहीसा अर्थ घ्यायला हवा.
अवांतर : "हत्यार्याना" ऐवजी 'खुन्यांना' हा शब्द नसता का चालला ? "हत्यारा" हा शब्द मराठी शब्दकोशात असला तरी जरा हिंदी मालिका / चित्रपटछाप वाटतो.