राज्य परिवहन मंडळ आपल्या जिव्हाळ्याच्या विषयापैकी आहे. विद्यार्थी, जेष्ठ नागरीक, अपंग, स्वातंत्र्य सैनिक, खेळाडू इत्यादींना सवलत देणारे असे ते मंडळ आहे.
त्याच बरोबर गाव तेथे गाडी अशीही योजना यशस्वीपणे राबवणारे जनहितकारी मंडळ आहे.
मी शक्यतो लाल पिवळाच डबा प्रवासासाठी वापरत असतो.
काही अवांतर : राज्य महामंडळ ही कल्पना आणि कार्यवाही मोरारजीभाईनी केली ( अनेक कॉग्रेस पक्षीयांचा विरोध असूनही). एकेकाळी वाहक चालक असणे कमीपणाचे समजले जाई. राज्य परिवहन मंडळ आल्यानंतर वधूपित्यांची आवड / प्राधान्य म्हणून या कर्मचाऱ्याकडे पाहिले जाई.
परिवहन मंडळाचा चाहता,
द्वारकानाथ