खांडेकर,
धन्यवाद प्रतिसादाबद्दल.
नुकतीच घराजवळ एक खार मरून पडलेली दिसली. एखाद्या गाडीचा धक्का असावा.
हे दु:खद, तितकेच आश्चर्यकारक आहे. खारींचा वेग जबरदस्त असतो. त्या सहजासहजी कोणाच्या हातात, गाडीखाली सापडत नाहीत.
त्या चिमुकल्या कलेवराची आणखी दुर्दशा होऊ नये, म्हणून उचलून बाजूला ठेवले.
जिवंत खारीचा मऊ स्पर्श झाला नसता, पण मृत्यूमुळे झाला.
किती विचित्र योगायोग !