मराठी माणसांच्या वृत्तीवरून येथे बराच उहापोह झालेला दिसतोय.....
सचिन ट्रॅव्हल्स चे नांव ह्या आधीही खराब झालेले होते व ठाणेकर, श्री. प्रमोद जकातदार (आमच्या भुसावळचे जावई ! ) ह्यांनी ह्या पुर्वीही खराब सर्व्हिस देण्याबद्दल चांगलेच नांव क(ग)मावले होते.
मध्यंतरी काळ गेल्यावर लोकांच्या विस्मरणात त्या गोष्टी गेल्या / नवीन मंडळी पर्यटनासाठी सचिनचा उपभोग घेऊ लागली असावीत.... परंतु प्रमोद जकातदारांच्या वरताण त्यांचा मुलगा (सचिन) असल्याचे जाणवते !
केसरी, राजा राणी, पवन (पुणेरी), चौधरी, गिरीकंद वगैरे ट्रॅव्हल्सही मराठीच मंडळी आहेत !
कार्यक्रमांत उणीवा असणे व तद्दन फसवणूक करणे ह्यात जमीन आकाशाचे अंतर आहे- छायाताईंची फसवणूक झाल्याचे स्पष्ट कळतेय व फसवणूकीसाठी माफी नसून शिक्षा असावी असे माझे मत आहे - अर्थात ती त्यांना मिळालीच !
हा लढा लढल्याबद्दल छायाताईंचे कौतुक करावेसे वाटते, एखादा "व्हाईट कॉलर्ड" (पांढरपेशा) असता तर आपल्या फसवणुकीची बोंब न करता गेले पैसे अक्कलखाती जमा असे समजून गप्प बसला असता.
अभिनंदन छाया ताई !