शुभान्कर
हे पैसे त्यांनी सहजपणे दिलेले नाहीत, 'तुमचे पैसे परत करू' असे जरी घटनास्थळी सांगितले असले तरी प्रत्यक्ष जे लोक पैसे मागायला गेले त्यांना 'सचिन'च्या ऑफिसमध्ये बरेच खेटे घालायला लागले. 'जकातदार आजारी आहेत, हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे, डॉक्टरांनी त्यांना कुणाशीही बोलायचे नाही सांगितले आहे' अशी अनेकविध कारणे देऊन लोकांना परत पाठविले जात होते. त्यामुळे कबूल करूनही जे करणे त्यांना टाळायचे आहे ते करायला लावणे हीच त्यांना एक प्रकारची शिक्षा होऊ शकते. जरी ते म्हणत असले आम्ही तिकिटाचे पैसे परत केले आहेत, तरी आम्ही झालेल्या मनस्तापाची नुकसानभरपाई म्हणून ते मागितले होते. पैसे दिले की आम्ही कुठे याची वाच्यता करू नये अशी त्यांची अपेक्षा होती, पण जरी त्यांनी नुकसान भरपाई दिली किंवा दिलगिरी व्यक्त केली तरी आमचे अनुभव लेखाच्या स्वरूपात कुठेही आणि कधीही मांडायचे आम्हाला स्वातंत्र्य आहेच. त्या स्वातंत्र्याचा आम्ही उपयोग केला हेच त्यांचे दुखणे.
आम्ही त्यांचे पैसे परत करण्यापेक्षा ज्यांना असा त्रास झाला त्या सर्व लोकांनी आपापले पैसे परत मागणे जास्त योग्य आहे असे मला वाटते. असे लोक कमी नव्हते. सचित्र गोंधळ आणि एकटे पडलेले जकातदार इथे पाहा.