१. काश्मिरी मिरच्या कशा असतात? (इंग्रजीत काश्मीर चिली वगैरे म्हणायचे का?) न सापडल्यास साधे तिखट बदली पदार्थ म्हणून वापरावे का? किती प्रमाणात?

काश्मिरी मिरच्या बोटभर लांब आणि गडद लाल असतात. त्या तिखटपणा पेक्षा रंगा साठी प्रसिद्ध आहेत. त्या न मिळाल्यास कुठलेही लाल तिखट चालेल.

२. एकदा तवा गरम झाल्यावर दुसऱ्या ऑम्लेटची पाळी आल्यावर तव्याला तेलाचा हात कसा लावायचा? (काही युक्ती?)

एक कांदा अर्धा कापून काट्याला टोचून ठेवायचा. हा कांदा, ऑम्लेट करण्याआधी, तेलात बुडवून गरम तव्यावर फिरवून घ्यायचा. म्हणजे तव्याला पुसट तेलाचा थर बसतो.