हे छायाचित्र ज्या धबधब्याचे आहे त्याला बहुधा अमेरिकन फॉल म्हणतात. कॅनडाच्या बाजूला नायगाऱ्यासमोर एक टॉवर आहे तिथून मी हे छायाचित्र घेतले आहे. इरी आणि ओंटॅरिओ लेक मधून येणारा धधब्याचा स्रोत यात दिसतो. खालच्या बाजूला मेड ऑफ दि मिस्ट मुख्य धबधब्याकडे जाताना दिसत आहे. कॅनडाच्या बाजूने संध्याकाळी ४ च्या  सुमारास तिथे दुहेरी इंद्रधनुष्यही दिसते. धबधब्याचे तुषार आणि सूर्याची स्थिती यामुळे त्यावेळी रोजच दिसत असावे. खूप छान दिसते तेही.