त्यामुळे पाणी जागा आणि ऊर्जा ह्यांचा वापरही वाढत आहे..........घटस्फोटित घरांमुळे दरडोई ३३% जास्त खोल्या वापरल्या जाऊ लागल्या.
हे बाकी खरे. तुटलेल्या घरांमुळे घर, पाणी, उर्जा, इंधन या सर्वांवर बोजा पडतो.
परंतु,
ह्याच पद्धतीने विभक्तकुटुंबपद्धतीकडून एकत्रकुटुंबपद्धतीकडे जाण्याने निसर्गसंगोपनास कितीतरी मदत होईल.
हे देखील खरे. निसर्गसंगोपनास मदत होईलच पण ही मदत करता करता मानसिक स्वास्थ हरवले म्हणून मानसोपचारतज्ज्ञांच्या रुग्णांची भरमसाठ वाढ झाली (ती तर घटस्फोटीतांचीही होत असावी) किंवा पुन्हा मध्ययुगीन अंधाऱ्या कालखंडाकडे वाटचाल होईल त्याचे काय?