जिवंत खारीला हात लावायचा आहे? शेंगदाणे हातात घेउन खारिंचा वावर असलेल्या झाडाखाली जा.. एका हातात शेंगदाणे घेउन दुसऱ्या हाताने त्याना कुरवाळायला मिळेल! अर्थात या गोष्टीला जरा वेळ हवा.. त्या खारी काही लगेच तुमच्या हातातले खायला लागणार नाहियेत..थोडी सवय झाल्यावर शेंगदाण्याच्या मिषाने त्या खारी तुमच्या घरी सुद्धा रहायला येतील! मात्र आधी सांगितल्याप्रमाणे त्या उंदरांप्रमाणेच सर्व खाद्यपदार्थांचा फन्ना उडवायला लागतील! उघड्यावर फळे, धान्य काहिही ठेवू शकणार नाही आपण...