दुरावा नको, नकोच आता सलज्ज सबबी
पुरे, लाडके, तुझे बहाणे, इथे न कोणी
फुलू देत बेलगाम ज्वाळा तनामनाच्या
पुरे धुमसणे, विझून जाणे, इथे न कोणी !
मस्तच! हे शेर विशेष आवडले. एकंदर गझल चांगली झाली आहे.
केशवसुमार, खोडसाळ वगैरे तिकडे तयार असतीलच! त्यांच्या विडंबनाचा मतला हा असा असेल -
तुझ्यासारखे , तुझ्याप्रमाणे इथे न कोणी
मला टाकणार कोण दाणे? इथे न कोणी!
शुभेच्छा!