नेहमीप्रमाणे तुम्ही दिलेली माहिती रंजक आहे. आधीचे प्रतिसादही आवडले.

इतर प्राणी विमानाने प्रवास करीत नाहीत. त्यांना वातानुकूलनाची गरज नसते. इतर प्राण्यांत विवाह कायदेही नसतात. लग्न नसते आणि कुठल्याही नोंदणीची गरज नसते. घटस्फोटासाठी न्यायालयात जावे लागत नाही आणि पोटगी वगैरेची भानगड नसते. इतर प्राण्यांना वातानुकूलित सभागृहात लग्नसोहळे ठेवावे लागत नाहीत. इतर प्राणी मधुचंद्रासाठी काश्मीरला किंवा होनोलुलूला जात नाही. त्यांची सूतिकागृहे नसतात. तसेच इतर प्राणी सिमेंट-काँक्रिटची घरे बांधत नाहीत आणि त्यांना वीजकपातीचा त्रास होत नाहीत. त्यांना इतरांच्या भाषा शिकाव्या लागत नाहीत. त्यांना विजा घेण्यासाठी एखाद्या वकालतीच्या बाहेर रांगेत उभे राहावे लागत नाही. त्यांना 'आपली भाषा कशी टिकून राहणार?" हा प्रश्नही पडत नाही.  मग ते ओहायोतून किंवा इचकरंजीतून शब्द टाकून आंतरजालावर मुशाफिरी करीत जागोजगी आपल्या अर्धवट ज्ञानाच्या टिचक्या मारत बसत नाहीत. त्यांना हिरवळ आवडत असली तरी ग्रीन कार्डसाठी तिष्ठत बसावे लागत नाही. त्यांना आपल्या आईवडलांना भेटण्यासाठी यायला सुट्या साठवाव्या लागत नाहीत... बऱ्याच गोष्टी आहेत. इथेच थांबतो. पण माणूस हा प्राणी तसा निसर्गविरोधीच आहे.