सकाळमधले परीक्षण आत्ताच वाचले. लेखकाच्या मतांशी मी फारसा सहमत नाही. मूळ चित्रपट खूप चांगला होता हे जरी मान्य असले तरी साडे माडे तीन ची हाताळणी वेगळी आहे आणि मराठीकरण करतांना मर्यादा येतातच असे माझे मत आहे. मी सांगीतल्याप्रमाणे शेवट आणि कलाटणी खूपच प्रेडीक्टेबल आहे आणि अतिशय सरधोपट मार्गाने चित्रीत केली आहे हे खरे पण म्हणून संपूर्ण चित्रपटाचा आकार बिघडलेला आहे असे मला वाटत नाही. साडे माडे तीन बघतांना कुठेच कंटाळा येत नाही आणि प्रेक्षकांना हसवत - हसवत कथानकात (प्रेडीक्टेबल असून देखील) गुंतवून ठेवण्यात तो यशस्वी होतो हे मात्र नक्की. हे अर्थात माझे मत आहे. मुंबईला भारतमातामध्ये आणि इतर चित्रपटगृहांमध्ये साडे माडे तीन चांगला चालतो आहे असे ऐकून आहे. माझ्या बायकोचा भाऊ रविवारी म्हणजे ९ तारखेला बघायला गेला होता पण 'हाऊस फुल्ल' मुळे २-३ तास थांबून देखील तिकिटे मिळाली नाहीत. याचा अर्थ महाराष्ट्रातल्या जनतेला हा चित्रपट आवडला आहे. अर्थात चित्रपट आवडणे - न आवडणे ही सापेक्ष गोष्ट आहे. त्यामुळे एकदा बघूनच खातरजमा करून घ्यावी, काय? :)