आपल्या मनामध्ये विशीष्ट प्रकराची साहचर्ये (associations) आपल्यावरील संस्कारामुळे झालेली असतात, त्यांच्यामुळे आपल्यावर त्या त्या संगीताचा काही विशीष्ट परिणाम होतो. उदा. संध्याकाळचे काही ठरावीक राग, दुपारचे राग वगैरे. तसेच हे जे वर म्हटले आहे, की अभंगाला पंजाबी ढंगाची चाल शोभणार नाही अथवा तो 'जाझच्या ठेक्यात' बसविला तर त्याचा अपेक्षित परिणाम होणार नाही, हे अश्या साहचर्यांमुळेच. जर समजा एखादा चिनी माणस आपला एखादा पं. भीमसेनांनी गायलेला अभंग ऐकत असेल, तर त्याच्यावर त्याचा काय परिणाम होईल? माझ्या अंदाजाप्रमाणे ( व थोड्याफार निरीक्षणाप्रमाणे) शून्य. आणि माझ्या स्वतःच्या अनुभवावरून हेही सांगतो की अगदी एखाद्या जान्यामान्या चिनी कलाकाराने विलक्षण समरसून गायलेल्या चिनी ऑपेऱ्यातील गीताचा माझ्यावर तरी शून्यच परिणाम होतो. कारण तेच-- त्या साहचर्याचा अभाव.