आपल्या मनामध्ये विशीष्ट प्रकराची साहचर्ये (associations) आपल्यावरील संस्कारामुळे झालेली असतात

अगदी! बाकीच्या प्रतिसादाशीही १००% सहमत.

'देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा' हे गाणे 'बार बार देखो हजार बार देखो' या क्लब साँगवर म्हणून पाहा. अतिशय श्रवणीय वाटते.

यापुढे मजेशीर गोष्ट म्हणजे तो चिनी मनुष्य उद्या भीमसेन जोशींच्या गाण्याने उत्साहीत होऊन ते गाणे बेसूर (केवळ जाणकार नसल्याने) गाऊ लागला तरी आपण त्याचे कौतुक करू की पाहा, 'दुसऱ्या संस्कृतीतून येऊन किती सुरेख गातोय.' आणि त्याच्या जागी एखादी भारतीय संगीत शिकलेली व्यक्ती गाऊ लागली तर म्हणू की 'ह्य! भीमसेन जोशींची सर नाही.'

माणसाचे माइंडसेट ठरलेले असतात. त्यातून बाहेर पडणे कठिण असते.