एखाद्या प्रकारचे अन्न, शीतपेय, भाषा (विशेषतः इंग्रजी शब्दांसाठी सुचविलेले मराठी शब्द) किंवा संगीत सुरुवातीला आवडत नसले तरी सवयीने आवडू लागते. ही शेवटी अधिगृहित अभिरुची (अक्वायर्ड टेस्ट) आहे, असे वाटते.
    म्हणूनच पंजाबी ढंगाने गायलेला अभंग एखाद्याला सवयीने आवडूही शकतो. 'मेरा नाम चुनचुनचू'सारखी पाश्चात्य संगीताचा प्रभाव असलेली फिल्मी गाणी अनेकांना आवडत नाहीत काय?त्याचप्रमाणे अरबी सुरावटींवर आधारित अनेक फिल्मी गाणीदेखील लोकप्रिय आहेत. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतावरही अनेक शतकांपूर्वी काही फारसी-अरबी संस्कार झाले आहेत. उदाहरणार्थ: यमन राग, ख़याल वगैरे.