निमिष ,

आपण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आजवर भल्या भल्या शास्त्रज्ञांनी, प्राचीन ऋषीमुनींनी जंग जंग पछाडले आहे.

पण पहिला पदार्थ, पहिला अणू-रेणू कसा निर्माण झाला याचे समाधानकारक उत्तर आजवर सापडलेले नाही. सुरूवातीला काहीही नसताना शून्यातून हे विश्व कसे निर्माण झाले , ही प्रक्रिया पुनः पुनः घडत असते का?, जीवन हे फक्त पृथ्वीवरच आहे का? जीव निर्माण होणे एवढे दुर्मिळ का? अन्यत्र जीवन असलेच वा नसले तरी त्याचा उद्देश्य काय? किंबहुना अब्जावधी तारे, आकाशगंगा इत्यादीं का निर्माण झाले आहेत याचा विचार करायला गेल्यास मति गुंग होऊन जाते.

भविष्यात कदाचित याचे उत्तर मानवाला नक्की सापडेल. विज्ञान ते नक्की शोधून काढेल.

याच संदर्भात आजपासून म्हणजे १२ डिसेंबर पासून रात्री १० आणि ११ वाजता हिस्टरी चॅनेल वर एक चांगला कार्यक्रम सुरू होणार आहे. कार्यक्रमाचे शीर्षक आहे द युनिव्हर्स - बियॉण्ड द बिग बँग - भाग १ व २.

वरील कार्यक्र्मात आपल्यालाच नव्हे तर असंख्य विचारवंतांना 'छळणाऱ्या' या कूट प्रश्नाचे, सध्या तरी अंशतः माहित असलेले उत्तर मिळेल असे वाटते.

तेव्हा जरूर पाहा हिस्टरी चॅनेल.

अधिक माहितीसाठी खालील दुवा पहा.

http://www.historychannelindia.com/default.aspx

-मंदार