श्री पंडित याचे अभिनंदन. अश्या घटना मराठी अस्मिता चेतवण्याचं काम करत असतात.

काहीसे अवांतर(?):
पण ही "मराठी" बातमी देताना मटा सारख्या वृत्तपत्राने काही शब्द इंग्रजी का वापरावेत असा प्रश्न पडला
या इतक्याशा बातमीत पुढील चार इंग्रजी शब्द आहेत जे मला तरी खटकले. ज्यातील काडिर्ऑलॉजिस्ट सोडल्यास प्रत्येक शब्दाला रोजच्या वापरातले मराठी शब्द उपलब्ध आहेत.
काडिर्ऑलॉजिस्ट
टॉपर
व्हाइस प्रेसिडेंट
एरियात
मटा सारख्या आघाडीच्या वृत्तपत्राला नवीन मराठी शब्दही रूढ करणं सहज शक्य आहे! तर किमान आहेत ते मराठी शब्द वापरण्याची अपेक्षा चूक नसावी