मुरारीबापू नावाचे संतबाबा हिंदी गाण्यांचा आपल्या प्रवचनात चांगलाच उपयोग करतात. राम चौदा वर्षांच्या वनवासासाठी निघाला तेव्हा अयोध्येची प्रजा किती व्याकुळ झाली, हे बापू 'हम तुमसे जुदा होके मर जायेंगे रो रो के' ह्या गाण्याच्या आध्यात्मिक आवृत्तीतून सांगताना मी ऐकले आहे. असो. शेवटी भावना पोचविणे आणि पोचणे महत्त्वाचे.