हिंदी गाण्यांचा चाली वापरून तयार केलेल्या भक्तिगीतांच्या ध्वनिफिती इत्यादी तुफान खपतात. मूळ गाणे कुठलेही असू शकते. अगदी जुन्या 'दर्दभऱ्या' हिंदी गाण्यापासून अगदी 'आजा मेरी गाडी में बैठ जा' किंवा 'चोली के पीछे क्या है' किंवा तत्सम गाण्यांवर आधारित भक्तिगीते, प्रार्थना  किंवा तत्सम गाणी मी वरील  ऐकलेली आहेत. कोणे एके काळी शिरडीत आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवर अशा ध्वनिफिती विकणाऱ्या ठेल्यांवर, टपरींवर होणारी तुंबळ गर्दी मी अनुभवली आहे.