'बनके तेरा जोगी'  गाणे माहित असूनही त्यावर पूर्वी फारसा विचार न केल्याने ते भजन आहे हे लक्षात आले नव्हते. काही दिवसांपूर्वी हे गाणे पुन्हा पुन्हा ऐकण्याची संधी मिळाली आणि हे भजन आहे हा उलगडा झाला. गाण्याचे शब्द नीट ऐकले तर ते अतिशय सुंदर आहेत. ते भजन आहे हे लक्षात घेतले नाही तरीही गाणे श्रवणीय आहे.