हॅम्लेट,  
एडस् हे नाव आयुर्वेदाला माहीत नव्हते. पण अशा प्रकारचा रोग होऊ शकतो याची कल्पना त्या शास्त्राला आली होती. 
प्रियाली व टग्या,
आपल्या मुद्यांशी काही अंशी सहमत होता येते. भाकडकथांची शक्यता बरीच आहे पण  काही मिनिंगफुल टेल्सही असतात. 
टग्या, 
'ही कल्पना म्हणा किंवा थिअरी म्हणा, जोपर्यंत एखाद्या ऋषीकडेच किंवा एखाद्या ग्रंथातच राहिली, तिचा सार्वत्रिक प्रसार झाला नाही आणि त्यावर अधिकाधिक लोकांनी विचारविनिमय किंवा संशोधन करून तिची अधिक घडण (डेवलपमेंट) केली नाही आणि त्यामुळे ती सामान्य वापरात आली नाही आणि त्यामुळे एखाद्या मर्यादित गटाकडेच राहून आणि वापर न होताच जर लोप पावली, तर "भारतीयांना या गोष्टीचे मूलभूत ज्ञान होते"ला काही अर्थही नाही आणि उपयोगही नाही, आणि म्हणूनच भारतीयांकडे (ऍज अ होल) त्याचे श्रेय जाऊ शकत नाही.' हे खरे आहे. आपण म्हटल्याप्रमाणे विपणनात भारतभू कमी पडलेली आहे. ज्ञानाबाबत नाही.
प्रियाली, 
आपल्या विधानात थोडी दुरुस्ती.
 वाचावे, आनंद घ्यावा, सध्याच्या विज्ञानाशी संबंध आहे का, याचा विचार करावा . खरेपणाच्या सर्व शक्यता पडताळून पाहाव्यात. असा विचार न करता लगेच विश्वास ठेवणे हे अंधश्रद्धेचे आधुनिक लक्षण मानावे लागेल. 
मंदार मोडकांचा प्रतिसाद जरूर वाचावा. विचारांना आणखी चालना मिळेल.
धन्यवाद.