प्राजु,
फार छान कविता...
झोपाळ्याची जुनीच करकर
सवे चिऊकाऊच्या गोष्टी..
त्यामागूनी सूरांत होतसे
तिन्हीसांजेची शुभंकरोती..
सुंदर कडवे....
...............................
मला वाटते, एकेक पायरी यशाची ती हे जे क़डवे आहे, ते नसते तरी चालले असते...या कवितेच्या पार्श्वभूमीला (पार्श्वसंगीतासारखी) कातरतेची, स्मरणरंजनाची एक हलकीशी धून आहे....तिला विसंगत असे हे कडवे वाटते...पण हरकत नाही...एकूण कविता चित्रमय आहे. वाचणाऱया ज्याला-त्याला लहानपणात घेऊन जाणारी...
...............................
कविवर्य ग. दि. माडगूळकर यांचे गाणे आहे...खेड्यामधले घर कौलारू...त्यातील ओळी आठवल्या...
झोपाळ्यावर अभंग कातर
सवे लागती कड्या करकरू
खेड्यामधले घर कौलारू....
शुभेच्छा....येऊ द्या आणखी कविता.