समाजात चांगले आणि वाईट, स्वार्थी आणि नि:स्वार्थी लोक सगळ्यांच पेशांत आहेत. मुद्दाम डॉक्टरांना का टार्गेट केलं जावं? मला वादात पडायचं नाहिये कारण बरेच मुद्दे उलट-सुलट चर्चिले जाऊ शकतात; उदा. डॉक्टरांची विश्वासार्हता/ पेशंटसचा डॉक्टरांवरचा अविश्वास, लोकांची ताबडतोब बरी होण्याची अपेक्षा आणि मेडिकल सायन्सच्या मर्यादा, प्रायव्हेट कॉलेजेसचे फुटलेले पेव आणि पैसे भरून आपल्या मुलांना डॉक्टर बनवू पाहणारी मंडळी, इ.इ.