संत तुकाराम विमानात बसून सदेह स्वर्गी गेले असे अनेकांना अजूनही वाटते. 'भाषा आणि जीवन' च्या  एका अंकात  भाषातज्ज्ञ आणि संशोधक विश्वनाथ खैरे ह्यांनी हे विमान म्हणजे लिंगायत आणि बहुधा इतर काही जातींत लोकांत अंत्यविधीच्या वेळेस पार्थिवास ज्या खुर्चीवर किंवा खुर्चीसमान वस्तूवर बसवून दफन करतात ती खुर्ची होय, असा काहीसा निष्कर्ष काढला आहे. आणि तो योग्यही वाटतो.  'विमान' ह्या शब्दाचा एक अर्थ अवमान, अनुद्गार असाही त्यांनी दिला आहे. (तो अंक सध्या माझ्याजवळ नाही. त्यामुळे काही शब्द इकडचे तिकडे झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे चुभदेघे.)