कोडे सोडवणाऱ्या सर्वांचे अभिनंदन. तसेच कोडे आवडले किंवा काही शोधसूत्रे आवडली असे सांगणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.
फेलुदा ज्यांना माहीत होता त्यांना तो शब्द लगेच येणार होता पण ज्यांना माहीत नव्हता त्यांना केवळ अधिक वेळ मिळाल्याने ते उत्तर येणार नव्हते. परंतु अशांनी गुगलून फेलुदाला शोधून काढले ह्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन!
ज्यांना फेलुदा हे उत्तर आले नाही त्यांच्यासाठी :
फेलुदा -श्री.प्रदोष मित्तर- हा सत्यजित रेंचा मानसपुत्र. फेलू हे त्याचे कौटुंबिक नाव. तो प्रायव्हेट डिटेक्टिव आहे. त्याचा १४/१५ वर्षाचा चुलत भाऊ तपेशरंजन (बालनाम-तोपशे) त्याला फेलुदा (फेलूदादाची बंगाली आवृत्ती) म्हणतो. फेलुदाच्या बहुतेक सर्व केसेसमध्ये तपेश त्याच्याबरोबर असतो. फेलुदाच्या सर्व कथा तपेशनेच सांगितलेल्या आहेत. होम्स-वॉटसन अशीच ही जोडगोळी आहे.
सत्यजित रेंनी किशोरवयीन मुलांसाठी लिहिलेल्या ह्या कथा मोठ्यांनासुद्धा आवडण्यासारख्या आहेत.
----------