अगदी मनापासून आणि अतीव आदराने म्हणतो : लेखाबद्दल आभार आणि अर्थातच या संदर्भातील आगामी मुख्य लिखाणाबद्दल प्रतीक्षा.
आणि काही प्रश्न :
>> असामान्य बुद्धीमत्ता आणि क्रयशीलता यापुढे विनम्र होणे आता काळाशी सुसंगत आहे की नाही, कुणास ठाऊक!
"क्रयशीलता" म्हणजे नेमके काय ? कारण "क्रय" चा अर्थ "लिक्विडीटी"या अर्थकारणाशी संबंधित संज्ञेशी आहे अशी माझी समजूत होती. "कृतिशीलता" असे तर तुम्हाला म्हणायचे नव्हते ?
>> त्यांचा तिरकस पण निर्विष विनोद
जी एंच्या विनोदाला १०० टक्के "निर्विष" म्हणता येईल का ? कितीतरी उदाहरणे अशी दाखवता येतील त्यांच्या कथांमध्ये की जिथे अगदी डार्केस्ट् पॉसिबल ह्युमर त्यानी उपयोजिला...
>> जी.ए. वरील लिखाणाच्या निमित्ताने समाजाच्या एका तुकड्याला हे तपासून पाहता आले, तरी ...
आयुष्याच्या सामाजिक अंगाचे फार ममत्व जी एना कधी नव्हते हे त्यांच्या कथेतून अप्रत्यक्षपणे आणि पत्रांतून थेट कळतेच. त्यामुळे तुमचे हे वाक्य कळले नाही.
तुमचे लिखाण खरोखर मनापासून आणि काळजीपूर्वक वाचतो. मला ते आवडते. "मा अतिप्राक्ष्यि" असा निषेध तुम्ही करणार नाही अशी आशा आहे