'क्रिएटिव्हिटी' असे मला म्हणायचे होते. क्रयशील हा शब्द चुकीचा असावा असे वाटते. कल्पकता हा शब्दकोशातला अर्थ मला फार उथळ वाटला.

जी.ए. वरील लिखाणाच्या निमित्ताने समाजाच्या एका तुकड्याला हे तपासून पाहता आले, तरी ...

आयुष्याच्या सामाजिक अंगाचे फार ममत्व जी एना कधी नव्हते हे त्यांच्या कथेतून अप्रत्यक्षपणे आणि पत्रांतून थेट कळतेच. त्यामुळे तुमचे हे वाक्य कळले नाही.

'मनोगत' वरील वाचक हा मला अभिप्रेत असलेला समाजाचा तुकडा. जी. एं. ना वाचकांबाबतही फारसे प्रेम कधी नव्हते, किमान तसे त्यांनी दाखवले आहे. आता तर काही प्रश्नच नाही...