आहे. अत्यंत सुंदर सुरूवात. पुढील भागांच्या अपेक्षेत.

एक छोटासा प्रश्नः  लेखकाचे लेखन बघा, त्यामागची व्यक्ती नको, वगैरे जर जी. ए. खरोखरीच मनापासून मानत असले, तर त्यांनी आपल्याजवळची पत्रे स्वतः जायच्या अगोदर का नष्ट केली नाहीत बरे? त्यांचे जाणे काही अचानक झाले नाही. बरे, आपण आहोत, तोंवर आपला सर्व पत्रव्यवहार त्यांनी नीट जपून ठेवणे, हे समजण्यासारखे आहे. पण ते जातांना मनात असते तर त्या सर्व पत्रव्यवहाराची विल्हेवाट लावू शकले असते. तसे त्यांनी काही केले नाही, म्हणजे आपण गेल्यावर आपल्याबाबतीतली 'अलिबाबाची गुहा' ते जाणूनबुजूनच उघडी ठेऊन गेले, असे समजायला वाव आहे!

दुसरा छोटासा प्रश्नः कै. म. वा. धोंडांनी मर्ढेकरांच्या साहित्यासंबधीत बरेच संशोधन केले आहे, व तद् अंगाने लिखाणाही. त्यांचा तर रोख नेहमी 'कविची कविता नीट कळण्यासाठी त्याच्या जीवनाची पाश्वभूमी समजली पाहिजे' असा काहीसा असल्याचे वाचले आहे. ह्या दोन (म्हणजे जी. एंच्या व धोंडाच्या) अगदी विरुद्ध मतांवर आपली टिप्पणी कृपया करावी.