एडसचा उल्लेख आयुर्वेदात येतो म्हणजे एडस भारतात होता आणि लागण भारतीयांद्वारे इतरांना झाली की भारतातील आयुर्वेदाचार्य आफ्रिकेत स्वयंसेवा करायला गेले होते?
या वाक्यामुळे मला एक प्रश्न पडलाय. त्याचं एखाद्या तज्ञाकडून उत्तर मिळाले तर बरे होईल.
आजच्या जगातील करोडो एडसबाधित व्यक्ती त्या मुळ आफ्रिकन रुग्णाच्या वंशज आहेत काय? म्हणजे एकाकडून दुसऱ्याला, त्याच्याकडून तिसऱ्याला असं होत ही संख्या एवढी वाढली आहे का?
म्हणजे असं म्हणता येईल की एखादी एडस नसलेली व्यक्ती एड्स नसलेल्या कितीही व्यक्तींशी असुरक्षित संबंध ठेवू शकेल? त्याने फक्त समोरची व्यक्ती एडस बाधित आहे का नाही याची काळजी घ्यावी? समजा एखाद्या बेटावर शंभर निरोगी व्यक्ती आहेत. त्यांच्यात त्यांनी कुणाशीही कसेही संबंध ठेवले तरी जोपर्यंत एखादी एडसबाधित व्यक्ती त्या बेटावर येत नाही तोपर्यंत त्या शंभरांमधील कुणालाही एडस होणार नाही काय?
कृपया शास्त्रीय माहिती द्यावी.