!? : कारण उचित शब्द घ्यायला मराठी दुकानात गेलो, पण दुकानदार दुपारच्या वामकुक्षीला निघून गेला असल्याने ' दुकान दु. १२ ते सं. ५ वा. पा. बं रा. उगाच दारावर टि, था, ठो इ. मारत बसू नयेत' [शब्दांचे दुकान असल्याने दुकानदार सगळे कसे थोडक्यात लिहीतो] हे वाचून परत यावे लागले. संध्याकाळपर्यंत थांबावे म्हटले, तर तेव्हढ्यात दुसऱ्या कुणाचा प्रतिसाद आला तर 'माझा नं. पहिला' हा आनंद मिळणार नाही. तेव्हा तसेच माहित असलेल्या शब्दांतच हा प्रतिसाद लिहीत आहे.

"नेमकं शेवटच्या प्रतिसादापाशी आल्यावर कृपया पान ताजंतवानं करायची सूचना झळकते. रिफ्रेश करत बसलं तर सगळं काही परत यायला पंधरा मिनिटं लागतात हे जाणून मनोगती पडद्यावर थोडं पाणी शिंपडतो आणि पडदा स्वच्छपणे पुसुन घेतो.काम होऊन जातं आणि तो स्वत:च्याच युक्तीवर जाम खूष होतो." हे फार आवडलं.

चिनी भाषेत !? म्हणजे 'oh, wonderful' असा होतो. नुसते तेव्हढेच 'विषय' ह्यात लिहीणार होतो. पण 'विषय अर्थवाही असणे आवश्यक आहे.' अशी दटावणी झाली, म्हणून तेच तिथे लिहून टाकले.