मलाच शोधते चहूकडे
वादळास मी भिडून पाहतो

वेळ ही अशी - जपून बोलतो
मी दिसेल ते दुरून पाहतो

मी अजून शोधतोच कारणे
तो जमेल ते करून पाहतो

सापडेल, सापडेलही झरा
खोल खोल मी खणून पाहतो... हे सारेच शेर सहजसुंदर!