प्रत्येक स्वराचा आणि प्रामुख्याने रागाचा एक विशिष्ट भाव असतो. एखाद्या गाण्याचा भाव भक्ती हा असेल तर त्या साठी काही विशिष्ट वाद्यव्रुंद केला जातो, जो भक्तिभाव जास्त चांगल्या प्रकारे प्रगट करू शकेल. त्या गाण्याला उडती चाल दिली तर ती वाईट असेल असं नाही पण तो भाव नीटसा व्यक्त होणार नाही. हा परिणाम आपल्या मनावर लहानपणापासून झालेल्या संस्कारांचा तर आहेच. आणि त्या विशिष्ट स्वरसमुदायाचा पण आहे.

भारतीय रागसंगीताचं महत्त्व आणि त्याचा माणसाच्या भाव-अवस्थेवरचा पगडा आता सगळं जग मान्य करतयं. त्यामुळेच रागसंगीत आणि ते सादर करण्याचा प्रहर ह्याचा विचार आपल्या जुन्या लोकांनी खुप पुर्वी केला होता आणि ह्याचाच एक भाग म्हणून संगीतोपचार ही एक meditation therapy म्हणून पुढे येत्येय.

राग ललत भल्या पहाटे ऐका आणि दुपारी ऐका फरक नक्की जाणवेल.

राग मारवा संध्याकाळी सुर्यास्ताच्या वेळेला जसा भावतो तसा इतर वेळेला नाही. कुमार गंधर्वांनी एकदा पुल आणि मंडळींना सकाळी उठवून मारवा ऐकवला होता. पण ते कुमार गंधर्व होते.

भावना आणि सुरांचं एवढं सख्य असल्यामुळे आजही कुणाचीही मंगलाष्टकं ऐकली की सर्व सासुरवाशीणींचे डोळे पाणावतात.