हवाईदलातील एका उच्चपदावरील निवृत्त अधिकाऱ्याचे वरील विषयावर विचार काय आहेत असे विचारल्याने माझी छान सोय झाली. ऐका तर माझे प्रस्ताव


ऱाष्ट्राचे धोरण ठरवताना ते एका विशिष्ठ व्यक्तीसाठी किंवा व्यक्तिसमूहासाठी वेगळे व अन्य सामान्य जनतेसाठी वेगळे असता कामा नये. हा महत्वाचा

निकष मान्य करता आला तरच पुढील चर्चा काही उपयोगाची ठरते.
तो निकष मान्य आहे असे मानून असा विचार करता येईल की जे दोन पर्याय आहेत पैकी ओलिस धरलेल्या व्यक्तींसाठी दहशतवाद्यांच्या अवास्तव आणि

अत्यंत अपमानास्पद मागण्य़ा मान्य करणे व त्याची पुर्तता करून ओलिसांची सुटका सुखरूप करण्याचा प्रयत्न करणे. मात्र त्या मागण्या मान्य करून ही

ओलिसांची सुटका सुखरूप होईल अशी शाश्वती नाही.
अर्थात हा धोपटपणाचा मार्ग निवडायचा असेल तर देशाच्या संरक्षणाच्या राष्ट्रीय धोरणाला काही अर्थ राहात नाही. पूर्व इतिहास आपणाला काय सांगतो ते

सर्वांना ज्ञात आहे.
मागण्या, ज्या सामान्यपणे 1) आमच्या संघटनेचे साथीदार जे कैदी केले गेलेत त्यांना सोडावे. 2) त्याशिवाय अमुक इतकी रक्कम, शस्त्रास्त्रे,

अमक्या बँकेत किंवा अमक्या ठिकाणी पोहोचवा.3) संपूर्ण काश्मीरला पकिस्तानचा अविभाज्य मान्य करून त्यावरील हक्क सोडला असा करार

पाकिस्तानशी करावा.4) भविष्य काळात (अणु) युद्ध करण्यासाठी भारताने प्रयत्न करु नये.
यावर उरला मार्ग काऊंटर ऑफेन्सिव्ह - उलटवार करण्याचा.
ज्या व्यक्तींना ओलिस धरलेले आहे, मग तो कोणी, कितीही उच्चपदावर आरूढ असेल तरी, त्यांनी किंवा त्यांच्या जवळच्या नातलगांनी,

हितचिंतकांनी ओलीसांना सोडवण्यासाठी, काहीही करा, कितीही किंमत द्यायला लागली तरी चालेल पण मला किंवा माझ्या नातेवाईकांना वाचवा असा

तगादा लावला तरी ओलिसांच्या मागण्यांना, धमक्यांना
भीक न घालता ते मागणी करत असलेल्या कैद्यांना वा अन्य साथिदारांना गोळ्या घालून  मारून त्यांच्या अन्य मागण्यांना धुडकाऊन लावत त्यांच्या

मागण्यातील महत्वाचा उद्देश नष्ट करणे. अर्थात हे करत असताना सामान्य मार्गाने चर्चा-वाटाघाटीचे गुऱ्हाळ, अन्य देशांना मधे घालून त्यांच्या

कूटनीतीचा अवलंब, सैनिक शक्तीचा वापर करून दहशतवाद्यांना पकडणे वा मारून टाकणे याद्वारे यश मिळवण्याचे काम चालू ठेवणे.
हे मार्ग लिहायला सोपे आहेत. पण त्यावर अंमल करण्याला अत्यंत उच्च दर्जाच्या नेतृत्व गुणांची, धैर्याची आवश्यकता आहे. सध्याच्या काळात

प्रसिद्दी माध्यामांची भूमिका अत्यंत कळीची आहे. काही गळे काढू व्यक्तीमत्वे व त्यांचे पित्ते यांना हाताशी धरून काही माध्यमे आपल्या विरोधी माध्यामांवर

कुरघोडी करण्यात आसुरी आनंद मानतात. हे आपण रोजच्या ताज्या ब्रेकिंग न्यूज मधून पहातो-वाचतो. ओलिस धरलेल्या व्यक्तींच्या घरी-दारी

जाण्यासाठी अत्यांतिक उत्साहाने चढाओढ करण्यात धन्यता न मानता, त्यांच्या नातलगांच्या मानसिक कमकुवतपणाचा फायदा विरोधकांना न मिळावा

याचे भान न ठेवता केले जाणारे रिपोर्टींग आणि लष्कराच्या कारवाईस बाधा येईल अशा चर्चा-प्रेक्षकांशी संपर्क, एस एम एसच्या द्वारे मतांची मागणी करून

वांझोटी परिक्षणे, यामुळे देशाच्या निश्चयाचा तेजोभंग करणाऱ्यांना आवर घालणे अत्यंत जरूरी आहे.त्यासाठी अशा टोकाच्या युद्धजन्य परिस्थितीत

आणीबाणीसदृश वटहुकूम अंमलात आणून त्यांच्या कारवायांवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. हे सर्व अमलात आणण्याला त्या विशेष उत्तेजित परिस्थितीत

राष्ट्राची मानसितकता तयार नसते. पण याची जाणीव ठेऊन जे राष्ट्र आपल्या जनतेला विश्वासात घेऊन आपले धोरण आखते, तो नेता, राष्ट्र

भविष्यकाळात सन्मानास पात्र होते.युद्धे लढाया वरचेवर होत नाहीत. पण देशाचे लष्कर नव्या नव्या युद्धव्यूहांचा-नीतींचा वारंवार सराव करते. त्या

प्रमाणे अशाच एका ओलीस धर