दहशतवाद्यांनी ओलिस धरलेल्यांच्या सुटकेच्याबाबत भारताचे राष्ट्रीय धोरण काय आहे ? 

असे काही राष्ट्रीय धोरण आहे असे वाटत नाही. अन्यथा "कंधाहार प्रकरण" घडलेच नसते!!

नसल्यास काय असावे?

एक प्रबळ, सार्वभौम राष्ट्र म्हणून तसेच एक उगवती महासत्ता (खरेच?) म्हणून असे वाटते की, दहशतवाद्यांच्या मागण्या मान्य न करता, ओलीसांची शक्यतो सुखरूप सोडवणूक करण्यासाठी हरसंभव प्रयत्न करणे, असे धोरण असावे. या "हरसंभव" प्रयत्नात लष्करी बळाबरोबरीनेच राजनैतीक संबंधांचा यथायोग्य उपयोग (दहशतवाद्यांवर आंतरराष्ट्रीय दबाव) किंवा तत्सम उपायांचा / प्रयत्नांचा समावेश आहे.

असो, शशिकांतराव या बाबतीत आपले मत जाणण्यास आम्ही अधिक उत्सुक आहोत.