आपण शर्टात अंग घालत असताना 'अंगात शर्ट घातला' म्हणतो; चपलेत पाय घालत असताना 'पायात चप्पल घातली' म्हणतो. अर्थाच्या दृष्टीने असे प्रयोग पूर्णतः चुकीचे आहेत, पण तरीही केवळ ते रुढ असल्यामुळे आपण दणकून वापरतोच ना ? ते वापरताना या चुका आपल्या ध्यानात तरी येतात का ?

कर्ता वाक्यात प्रथम आला आहे‌. शर्ट किंवा चप्पल हे स्वत:कडे कतृत्व घेवू शकत नाहीत. कर्तेपण हे आपल्याकडे असल्यामुळे असा शब्दप्रयोग होतो.