माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल आजानुकर्णांचे मनःपूर्वक आभार! गैरसमजाचा भाग नाही, कारण चर्चेतूमुळेच नवनवीन गोष्टी कळतात. आपण दिलेल्या माहितीने इस्त्राएलबद्दल एक नवीन पैलू कळला. याच अनुषंगाने मध्यपूर्वेतील परिस्थितीबाबत एक लेख काही वर्षांपूर्वी वाचनात आला होता. लेख वाचून प्रत्येकाने आपापले मत ठरवणे हे उत्तम. त्या लेखकाशी मी सहमत नसलो तरी त्यातून इस्त्राएल आणि त्यासंबंधीच्या गुंतागुंतीचा इतिहास कळला. विविध स्त्रोतातून मिळालेल्या माहितीमुळे माझे अजूनतरी इस्त्राएलबद्दल चांगले किंवा वाईट असे कोणतेच मत झालेले नाही.
धोरणात्मक विचार करता इतर देशांनी केलेल्या उलाढाली, त्याचे बरे-वाईट दुष्परिणाम, यांच्या अभ्यासाचा उपयोग झाला तर चांगलेच आहे. न झाला तरी (एक सामान्य नागरिक म्हणून) भारतासाठी काय उपयुक्त आहे हे बघायचे आणि पुढे जायचे.
चर्चा छान रंगली हे मात्र खरे, :)