संदीप, छान सुरुवात आहे. आवडली. येऊ द्या. 'गमभ' शुद्धचिकित्सकाचा वापर करावा. शुद्धलेखनाने कवितेचे किंवा कुठल्याही साहित्याचे देखणेपणे द्विगुणित होण्याची शक्यता असते. दोन ओळींतले अंतरही नियंत्रित करावे, असे एकंदर वाचक म्हणून सुचवावेसे वाटते.
सर, आपल्या शाळेत मला
पुन्हा प्रवेश घेऊ द्या
दुनिया ओशाळ वाळवंट
इथल्या सावलीत जरा बसू द्या
सर तुमच्या तासाला
तसंच मुद्दाम शिंकू द्या
डस्टरचा नेम मात्र
तुम्ही तसाच चुकू द्या
सर तुमच्या छळ्यांनी
हातांवरच्या दिसल्या रेषा
तेच हात घेऊन आलोय
अजून थोड्या छळ्या द्या
सर, आपल्या शाळेत मला
पुन्हा प्रवेश घेऊ द्या