चित्रे साठवण्याची/दाखवण्याची सुचवण अनेकदा केली जाते. हीही सुचवण विचारात घेतलेली आहे. सध्या ड्रुपल ची नवी आवृत्ती प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे, ती झाली की तिच्यातली बलस्थाने, पेचप्रसंग, सेवादात्यावर पडणारा बोजा आदींचा अभ्यास केल्यावर ह्या/अश्या सुचवणींचा विचार करता येईल, असे वाटते.

ह्यापूर्वी शुद्धिचिकित्सक, लेखमालिका, कविता, कार्यक्रम, पाककृती, कूटप्रश्न, नेहमी पडणारे प्रश्न इत्यादी बदल / घडणी सदस्यांच्याच सुचवणींच्या आणि अश्या साहित्यनिर्मितीच्या सातत्यातून परिणत झालेल्या आहेत हेही सांगावेसे वाटते.