२.४) अमेरिकेने जपानवर टाकलेली अण्वस्त्रे ही महाभयंकर आणि संहारक होती. ती त्यांनी निर्दोष नागरिकांवर टाकली आणि त्या कृत्याचे कोणीही कधीही समर्थन करू शकत नाही.
इथवर ठीक आहे. पण...
खुद्द अमेरिकेतही ज्या पक्षाच्या अध्यक्षांनी (डेमोक्रॅटिक पक्षाचे हॅरी ट्रुमन) त्यास संमती दिली तो पक्ष आजतागायत क्लिंटन यांचा अपवाद वगळता फारसा सत्तेत येऊ शकलेला नाही.
क्लिंटनव्यतिरिक्त जॉन एफ. केनेडी आणि जिमी कार्टरही डेमोक्रॅटिक पक्षाचे होते. पैकी केनेडी बऱ्यापैकी लोकप्रियही होते, असे वाटते. आणि या दोघांच्या निवडून येण्यामागे (किंवा इतर निवडणुकांत डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष निवडून न येण्यामागे) ट्रूमनसाहेबांनी जपानवर अणुबाँब टाकण्यास संमती देण्याचा किंवा एकंदरीत अमेरिकेच्या (किंवा डेमोक्रॅटिक पक्षाच्या) अण्वस्त्रविषयक धोरणांचा काहीही संबंध नव्हता, असे वाटते. (इट्स् द इकॉनॉमी, स्टुपिड!)
उलटपक्षी रिपब्लिकन पक्षाचे / अध्यक्षांचे अण्वस्त्रविषयक धोरणही फारसे 'अहिंसक' वगैरे आहे, अशातलाही भाग नाही.
जेथे केवळ द्विपक्षीय पद्धती आहे त्या अमेरिकेची ही कथा तर इतरत्र विचारही करायला नको.
१९९८च्या अण्वस्त्रचाचणीनंतर त्या भांडवलाच्या जोरदार आधारावरच तर अटलबिहारीजींचे सरकार पुन्हा निवडून येऊ शकले, असे म्या अडाणी पामराचे विनम्र मत आहे.